आमच्या येथे
श्री. गणेश पूजा, सत्यनारण पूजा,
वास्तुशांती, जननशांती व सर्व धार्मिक विधी
स्विकारल्या जातील

आमची ओळख

शिवकरुणा ज्योतिष वास्तू पुरोहित हे ज्योतिषशास्त्रासंबंधी सर्व कार्यांसाठी कार्यरत आहे. येथे ज्योतिष, वास्तु, पुरोहिती, कुंडलीमिलन, मन्त्र-तंत्र, पंचांग, राशी विश्लेषण आणि इतर संबंधित विषयांवर मार्गदर्शन करण्याच्या सेवा दिल्या जातात. शिवकरुणा ज्योतिष वास्तू पुरोहित यांच्याकडून ज्योतिषसंबंधित सर्व विषयांवर मराठीत सहज व सरस माहिती पुरवली जाते. आमचे विशेषकर म्हणजे जन्मकुंडलीमध्ये प्रमुख ग्रहांच्या दशेचा विश्लेषण करून, त्यांच्या जीवनातील प्रमुख क्षेत्रात कठीणतेचे समस्या आणि अडचणी असल्यास, उपयुक्त सल्ले व मार्गदर्शन देणे.

आमची वैशिष्टे

  • सर्व पूजा विधी धर्मिक पद्धतीने केल्या जातात.
  • प्रतेक पूजा विधी ह्या शुभमुहूर्तावर केल्या जातात..
  • प्रतेक पूजेचा योग्य तो लाभ होतो.

सत्यनारायण पूजा

ही पूजा सामान्यत: प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, एकादशी (पौर्णिमेच्या किंवा अमावास्येच्या 11 व्या दिवशी) वा अन्य शुभ दिवशी केली जाते.हे विशेष प्रसंगी आणि यशाच्या वेळी, परमेश्वराचे आभार मानण्यासाठी देखील केले जाते.

वास्तुपुरुष म्हणजे काय?

पूर्वीच्या काळी अंधवधाच्या वेळी शंकराच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले त्यापासून एक भीषण व अक्राळविक्राळ प्राण्याची निर्मिती झाली. तो पृथ्वीवर पडणाऱ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाला पिऊ लागला. पृथ्वीवर एकही थेंब रक्त शिल्लक राहिले नाही तेव्हा तो शंकराची तपश्चर्या करू लागला. शंकराला प्रसन्न करून त्याने तिनंही लोकांना संपवण्याचा वर मागितला.

कालसर्प शांती

अगदी नावाप्रमाणेच “कालसर्प योग” हा सर्व सौख्य हिरावून घेणारा अत्यंत घातक असा योग आहे. अशा योगास कालसर्प म्हणण्यामागे कारण हे आहे कि कालसर्प योगात राहू व केतू असतात. त्यामुळे सर्व कार्यात अपयश येते. तसेच सर्व प्रकारच्या उत्कर्षांमध्ये अडचणी निर्माण होतात. हा योग बनल्यावर जातकास अनेक संघर्षातून जावे लागते व अडचणींचा सामना देखील करावा लागतो. कालसर्प योग हा कुठल्याही व्यक्तीच्या कुंडलीत असू शकतो मग ती व्यक्ती श्रीमंत असो, गरिबीत असो, राजकारणी, नोकरदार किंवा व्यावसायिक असो या भौतिक हुद्यांनी काही फरक त्यात होत नाही. अशा व्यक्तीला सर्व सुख सुविधा उपलब्ध असल्या तरीही अनेक संकटांना, कष्टाला सामोरे जावे लागते. अशा व्यक्तीला गुप्त शत्रूंचा त्रास, अकस्मात अपघातांना तोंड द्यावे लागते.

मंगळ दोष

दोष मंगळ ग्रहाच्या कुंडलीत १२ स्थानांपैकी कुठल्या स्थानात मंगळ आहे त्या स्थानावरून निश्चित केला जातो. जेव्हा एखाद्याच्या जन्मपत्रिकेत मंगळ ग्रह १, ४, ७, ८, १२ यापैकी एका स्थानात जन्माच्या वेळी आला असेल तर हा दोष उद्भवतो.

अनेक लोक केवळ पत्रिकेत मंगळ आहे हे पाहून घाबरतात व नको ते गैरसमज करतात. केवळ पत्रिकेत मंगळ दोष असल्याने अशुभ होत नाही. मंगळाच्या पत्रिकेत चार स्थिती असतात - आंशिक मंगळ, सौम्य मंगळ, वक्री मंगळ व तीव्र मंगळ. या गोष्टी विचारात घेऊनच मंगळाची स्थिती ठरवणे श्रेयस्कर असते, केवळ पत्रिकेत मंगळ असल्याने घाबरून जाऊ नये. मंगळ दोषाचा प्रभाव किती आहे हे पत्रिकेवरूनच निश्चित सांगता येते.

तिथी दोष पूजा : तिथी दोष शांती पूजा.

जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला किंवा शुक्ल पक्षातील अमावस्या किंवा प्रतिपक्षाला झाला असेल तर त्या व्यक्तीला दोष लागतो. त्यामुळे या कारणांमुळे शांतीपूजा आवश्यक आहे. २)नक्षत्र दोष पूजा नक्षत्र दोष शांती पूजा नक्षत्रांची एकूण संख्या 27 आहे. परंतु या नक्षत्रांमध्ये व्यक्तीच्या जन्मामुळे दोष निर्माण होतो.

योग दोष शांती

जर एखाद्या व्यक्तीचा जन्म खालील योगात झाला असेल तर त्याला अपराधी वाटते. याचा परिणाम त्याच्या जीवनात अनेक प्रकारे होतो

व्यतीपात

वैधृती

अशा परिस्थितीत शांतीपूजा विधी आवश्यक आहे

||श्री गुरु मंत्र महति||

नमः शिवाय,ॐ नमः शिवाय | मंत्रमनी ठसला ||

चहू वेदांच्या, शब्द सागर | मंथनी सापडला || दयाळा ||१||

बीज मंत्र हा, नमः शिवाय || आपलासा केला |

सदा जपे जो, प्रेम भक्तीने | भवसागर तरला || दयाळा ||२||

आधी व्याधीही,पळती भिऊनी | म्हणती काळ आला ||

पाहुनी ऐशा शिवभक्ताला | यमही थरथरला‌‌ || दयाळा ||३||

काय वर्णू मी, महिती त्यांची | शिव शिव जो वदला ||

शब्द रूपाने, जणु शिवशंकर | हृदयामध्ये शिरला || दयाळा ||४||

हृदयाकाशी,शिव शक्तीमध्ये | प्रकाश लखलखला ||

पाहि जीव त्या, प्रकाश योगे | सर्व खलु वदला || दयाळा ||५||

नमः शिवाय,सतताभ्यासे| सर्व उपाधीला|| \

त्याजुनी पावला,जीव अनादी | सोहं वृत्तिला || दयाळा ||६||

सोहं जपता,नाम शिवाचे | आत्मत्वी रमला ||

म्हणूनी जपा तुम्ही, नमः शिवाय | सांगे जगताला || दयाळा ||७||

||गणपती आरती||

लंबोदर गणराज,जय जय | लंबोदर गणराज ||धृ||

मंगलमूर्ती,हे गणपती ! गौरी तनय,तुजला म्हणती | मूषक असे,वाहन असती,पूजा पहिली, सर्व ही करिती | शंभूकृपे गणराज्ज ||१||

जय जय लंबोदर गणराज||

वक्रतीशुंडा,एकचिदंत,बुद्धि दयाधन,वंघ असता |

दुःखचिहर्ता,तू सुख कर्ता, विघ्ने सगळी,तुलाचि स्मरितां |

जाती पळूनहि आडज ||२||

जय जय लंबोदर गणराज||

दूर्वांकुराणि,पूजन करितो, मोदक लाडू,तुला अर्पितो मस्तक प्रेमे,चरणी ठेवितो,रेवणसिद्घ, श्री गुण गातो |

पूज्य गजानन,राडज ||३||

जय जय लंबोदर गणराज||

||आरती शंकरची||

लंबोदर गणराज,जय जय | लंबोदर गणराज ||धृ||

मंगलमूर्ती,हे गणपती ! गौरी तनय,तुजला म्हणती | मूषक असे,वाहन असती,पूजा पहिली, सर्व ही करिती | शंभूकृपे गणराज्ज ||१||

जय जय लंबोदर गणराज||

वक्रतीशुंडा,एकचिदंत,बुद्धि दयाधन,वंघ असता |

दुःखचिहर्ता,तू सुख कर्ता, विघ्ने सगळी,तुलाचि स्मरितां |

जाती पळूनहि आडज ||२||

जय जय लंबोदर गणराज||

दूर्वांकुराणि,पूजन करितो, मोदक लाडू,तुला अर्पितो मस्तक प्रेमे,चरणी ठेवितो,रेवणसिद्घ, श्री गुण गातो |

पूज्य गजानन,राडज ||३||

जय जय लंबोदर गणराज||

||आरती देवीच्या||

येमाई आरती नवलाई | ग माझे आई तू वरदाई ||धृ||

हाती घेवूनी शंख, चक्र,गदा,पद्य |

धनुष्य बाण दंड खड्ग वज्रशुल रक्षिसी शिवाबाई ||१||

महिषासुर चक्षु चामर कैटभ |

निंशुभ शुंभ चंडमुड अरिवर्ग जिंकीसी जयकाली||२||

आश्विनमासी सिंहावरी अंबाबाई |

पुजिले भक्ते रात्री नऊ सरस्वती वंदितो तवपायी ||३||

करुणाकरी आई अंब चतुराई |

वरदादेवी स्वामी रेवणसिद् धासी पावगे लवलाई ||४||

||आरती देवीची||

जय जय भवानी,मन रमणी,माता पुरवासिनी |

चोदा भुवनांची,स्वामिनी, महिषासुर मर्दिनी ||धृ||

नेसुनी पाठवा,पिवळा | हार शोभे गळा | हाती घेवूनिया,त्रिशुळा,भाळी कुंकम टीळा ||१||

अंगी ल्यालीसे,काचोळी,वरमोत्यांची जाळी | हृदया झळकली,पिवळी,गळा ही गरसोळी ||२||

पायी घागरीया,खुळखुळ,नाकी मुक्ताफळ |

माथा शोभतसे,कुरळ | नयनी हे काजळ ||३||

सिंहावरी तूं,बैसोन,मारिसी दानव गण |

तुजला नमितो मी, निशिदीन | गोसावी नंदन ||४||

||आरती श्री गुरुंची||

ओवाळू गुरुला आरती गुरुला आरती |

लाऊनी पंचप्राण ज्योती ऽ ओवाळू ||धृ||

तू तारक सद्गुरु मूर्ती सद्गुरु मूर्ती पतित भव जन उध्दरती । ऽ ओवाळू ||१||

गुरु लिंग जंगम सेवा जंगम सेवा हा स्वधर्म आपुला ठेवा । ऽ ओवाळू ||२||

करी दया कृपेची छाया हरी भवभया श्रेष्ठ गुरुराया प्रेमे ओवाळीन ही काया तवपदि । ऽ ओवाळू ||३||

हरी हरा हरी हरा,आणिक सुरवरा,मार्ग दुसरा,नसेकि पाहता,नसेकि पाहता, म्हणून श्रेष्ठ गुरुजगता । ऽ ओवाळू ||४||

गुरुराज,गुरुराज,भक्त जन काज राखी मम लाज आलो मी शरण,आलो मी शरण म्हणे विश्वनाथ हा दीन । ऽ ओवाळू ||५||

||कर्पुराची आरती||

कर्पुराची आरती उजळूनिया | भावे ओवाळीन मी शिवराया ||धृ||

दशभुज पंचवदना शिवा | दाक्षायनी वरीते महादेवा |

ज्याने कंठी विष धरिले | नरमुंडांच्या माळा | नंदीवर बैसोनी फिरतो । ऽऽऽ | नेत्री अग्नी ज्वाळा ||१||

अंगी विभूतीचा लावी पटटा | संगे भूतावळी करीती चेष्ठा |

जटेत गंगा चोरुनी ठेवली | पार्वतीच्यासाठी | दोघीमध्ये कलह माजला । ऽऽऽ | समजावी जगजेठी ||२||

सर्पोंनी वेष्टिले सर्व अंगी | सरसीच्या दर्वोचित पद योगी |

ज्याचा पुत्र वीरभ्रद दुजा | कार्तिकस्वामी | त्रिजा गणेश धावूनी येई । शंकर मृग्रेंद्र कामी ||३||

||कर्पुराची आरती||

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजर्गेंद्र हारम |

सदावसंत हदयारविदं भवंभवानी सहितं नमामि |

गुणातीत कांतं परब्रम्हशांत सुविद्यादिदेवं भवारण्य दाहं |

उमानाथ मीशं | जरा जन्मनाशं परंज्योतिर्लिंग नमामीष्टलिंगम् |

|| कर्पूरदीपेन नीराजयामी ||

footer